मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या राजीनाम्याची दिल्ली दरबारी दखल घेण्यात आलेय. गुरुदास कामत काँगेसध्येच राहतील, असे वक्तव्य रणजीत सुरजेवाला यांनी केलेय. तर निवडणुकीवेळी नाराजी अयोग्य, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुदास कामतांच्या राजीनाम्याची दिल्लीत दखल घेण्यात आलीय. गुरुदास कामत काँग्रेसमध्येच राहतील आणि जे मुद्दे आहेत त्याबाबत पक्ष नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करेल, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलीय. 


नाराजी योग्य नाही!


तर महापालिका निवडणूक जवळ आली असताना अशी नाराजी योग्य नाही, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. गुरुदास कामत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असून ते समजून घेतील, अशी आशाही पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलीय. 


काँग्रेस नेते गुरुदास कामत हे एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यावर ठाम राहण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीदेखील जेव्हा जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा तेव्हा ते त्यावर ठाम राहिले. त्यामुळे यावेळी काय करतात, याकडे लक्ष लागलेय.


काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर


मुंबई काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. मुंबई काँग्रेस दिवसेंदिवस वाढत चालेला संजय  निरूपम यांच वर्चस्वासला विरोध सुरू झालाय. ज्येष्ठ काॅग्रेस नेते आणि माजी खासदार गुरूदास कामत यांनी पदाचा दिलेला राजीनामा आणि राजकारणातून संन्यास करण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेस कामत गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामत यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी जमले होते. कामत यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडवर काँग्रेसमध्ये सुरू आलेल्या या वादळमुळे पक्ष स्तरीय गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय.


निवडणुका तोंडावर संघर्ष


मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच मुंबई काँग्रसमधील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या निरुपम यांचे मुंबई काँग्रेसमधील महत्त्व वाढल्याने जुने काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते तीव्र नाराजी आहे. या निमित्ताने पुन्हा काँग्रेसमधील या गटातटाच्या राजकारण पुढे आलेय.