मुंबई : बाळासाहेबांना धडा शिकवायचा आहे, असे मला हाफीज सईदेने सांगितलं होते. काम पूर्ण करायला ६ महिने लागतील असे मी हाफीजला सांगितलं होते. तसेच सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची रेकी केली होती. मात्र, इस्त्राईल दुतावासाची रेकी केली नव्हती, अशी कबुली २६/११ हल्ल्यातील माफिचा साक्षीदार अतिरेकी डेव्हिड हेडली यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवरील काही सुरक्षारक्षकांची मी भेट घेतली होती. मी शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीची रेकी केली होती. तसेच सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची मी रेकी केली होती, असे हेडलीने आज सांगितले.


तसेच माझ्या चौकशीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मला ६-७ फोटो दाखवले. ज्यावर नाव लिहिली होती. मात्र वकिलांनी आक्षेप घेतल्यानंतर एनआयएने नावाशिवाय फोटो दाखवले होते. एनआयएने दाखवलेल्या फोटोंच्या आधारे मी न्यायालयात फोटो ओळखले असं म्हणणं चुकीचे असून ६ ते ७  फोटोंपैकी मी फक्त एकच ओळखला असल्याचं हेडलीने सांगितले.