सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?

मुंबई : वादग्रस्त व्यंगचित्रानंतर 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झालाय. आजच्या सामनाच्या पुरवणीत हसोबा प्रसन्न हे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्या व्यंगचित्राचे सदर प्रसिद्ध झालेल नाही.

गेल्या आठवड्यात सामन्यातील व्यंगचित्रावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता. सामनाच्या अंकाची होळीही करण्यात आली.

व्यंगचित्र वादाप्रकरणी काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत माफी मागितली. व्यंगचित्रातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
hasoba prasanna sadar not in samna
News Source: 
Home Title: 

सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?

सामनातून 'हसोबा प्रसन्न' गायब?
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes