मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी
मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला आहे, सखल भागात पाणी साचलं आहे. ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतही मुसळधार पाऊस होतोय.
मुंबई : मुंबई शहरात मुसळधार पाऊस झाला आहे, सखल भागात पाणी साचलं आहे. ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतही मुसळधार पाऊस होतोय.
दक्षिण मुंबईत तासाभरापासून जोरदार पाऊस होतोय. सकाळी सहापासून या पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत १२ तासात ४१ मिमी पाऊस झाला आहे.
मुंबई शहरात १२ तासात ६९ मिमी पाऊस झाला आहे. तर पश्मिम उपनगरात ७४ मिमी पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे.