मुंबई : सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसत नसला तरी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, कांदिवली ,बोरिवली ,दहिसर येथील सखल भागात पाणी भरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपर, चेम्बूर, कुर्ला पूर्व उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली. रविवार असल्याने मुंबईकरांना या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान घाटकोपर रेल्वे स्थानकात छप्पर तुटला.


बोरिवलीतही सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावलीये.. पावसामुळे रस्तेवाहतूक मंदावली आहे.


मुंबईसह ठाणे आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे ठाण्यातील पाचपाखाडी, वंदना आणि राबोडी या ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचलं आहे त्यामुळे काहीकाळासाठी वाहतूक खोळंबली होती. 


रात्रभर घेतलेल्या विश्रांतीनंतर कल्याणमध्ये सकापासूनच पावसानं पुन्हा दमदार सुरुवात केलीये. कल्याणच्या सखल भागात या पावसानं पाणी साचण्यास सुरुवात झालीये. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर भागातही सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. 


वसईतही पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या 24 तासांत वसई परिसरात 52 मिमी पावसाची नोंद झालीये. सुदैवानं वसईत थांबून थांबून पाऊस पडत असल्यानं कुठेही पाणी साचल्याची घडना घडलेली नाही.


मुंबई आणि कोकण किनारपट्टी जवळच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.