मुंबई : येत्या 24 तासात कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ३ दिवसापासून राज्यभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. पण आता पावसानं विश्रांती घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत पावसाची कालपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे.


पुरामुळे पाणी शेतात घुसलंय. नदी किनारी सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूरमध्ये बाजार  पेठेत पाणी घुसलंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी आहे मात्र रात्री पडलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.