मुंबई : विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, शाळेत मस्ती करतात, अशा विविध कारणांसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. पण मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेनं मुलीनं हातावर मेहंदी काढली म्हणून शिक्षा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादरमधल्या साने गुरुजी शाळेमधल्या दुसरी इयत्तेतल्या विद्यार्थिनीबाबत हा धक्कादायक प्रकार घडलाय. हातावर मेहंदी काढली म्हणून या लहान मुलीला शाळेतून चक्क घरी पाठवलं गेलं. 


साराह गुप्ते या विद्यार्थिनीने एका कार्यक्रमासाठी हातावर मेहंदी काढली होती. पण, शाळेच्या नियमात बसत नसल्याचं सांगत, शाळेनं तिच्या पालकांना बोलवून घेतलं आणि तिला घरी नेऊन जायला सांगितलं. इतकंच नाही तर मेहंदी निघेपर्यंत मुलीला शाळेत पाठवू नका, असं बजावायलाही शाळा विसरली नाही. 


दरम्यान, प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलल्यानंतर, शाळेने अखेर साराहला वर्गात बसू दिलं. मात्र शिक्षण महत्त्वाचं की मेहंदी ही साधी गोष्ट शाळेला कळत नाही का? असा प्रश्न यातून उपस्थित होतोय.