मुंबई : छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवले यासाठी डॉ. तात्याराव लहाणेंना ८ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमएलए कोर्टाने डॉ. तात्याराव लहाणेंना आपली बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत. छगन भुजबळांच्या तीन वैद्यकीय चाचण्या आवश्यक होत्या. त्यापैंकी दोन वैद्यकीय चाचण्या जे जे हॉस्पिटलमध्ये आणि एक चाचणी तात्याराव लहाणे सांगतील तिथे करावे असे आदेश २७ ऑक्टोबरला न्यायालयाने दिले होते. 


जे जे हॉस्पिटलमध्ये दोन वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्यांना ३ नोव्हेंबरला तिसऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी बॉम्बे हॉस्पिटलला हलविण्यात आलं. मात्र, वैद्यकीय चाचणी झाल्यानंतरही भुजबळांचा मुक्काम बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिला. 


यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गेले ३० दिवस बॉम्बे हॉस्पिटमध्ये त्यांचा मुक्काम का? याबाबत खुलासा करण्यासाठी कोर्टानं तात्याराव लहाणेंना उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत.