मुंबई : मुंबईतल्या चर्नीरोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आलाय. यापुढील उपचारासाठी तिला अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळपासूनच अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयातील टीमनं डिस्चार्ज रिपोर्ट घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. इमानच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतर इमानच्या डिस्चार्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. 


इमानच्या बहिणीने -  शायमानं डिस्चार्ज पेपरवर सही करण्यास नकार दिल्यानं या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. या समस्येतून मार्ग काढण्यसाठी आरोग्यमंत्री दिपक सावंत सैफी रूग्णालयात दाखल झाले. त्यानंतर इमानच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 


इमानसोबत अबुधाबीला सैफी हॉस्पिटलची 13 डॉक्टरांची टीमसुद्धा जाणार आहे. सैफी हॉस्पिटलपासून विमानतळापर्यंत इमानला नेण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास एअरबस-३००ने इमानला अबुधाबीला नेण्यात येणार आहे.


11 फेब्रुवारीला इमानला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इमान आली तेव्हा तिचं वजन तब्बल पाचशे किलो होतं. आता शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन 171 किलो इतकं झालंय. अबुधाबीतल्या उपचारानंतर इमानला चालणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.