युती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांची तिखट प्रतिक्रिया
भ्रष्ट्राचार मुक्त मुंबईसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची ही भूमिका त्यांना खूप जिव्हारी लागली, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेने तोडलेल्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भ्रष्ट्राचार मुक्त मुंबईसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची ही भूमिका त्यांना खूप जिव्हारी लागली, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेने तोडलेल्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
गोरेगाव येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केली. यावर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या बोलत होते.
यापुढे स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुंबई हे भाजप आणणार असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.