सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल, तटकरे अडचणीच्या फेऱ्यात
सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कोंढाणे धरण प्रकल्प अनियमितताप्रकरणी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कोंढाणे धरण प्रकल्प अनियमितताप्रकरणी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा अधिकारी आणि कंत्राटदार खत्री याच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकल्पाला तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळं पहिल्यांदाच सिंचन घोटाळाप्रकरणी तटकरे एसीबीच्या चौकशीच्या फे-यात सापडले आहेत.
तत्कालीन अधिकारी आणि एफ ए एन्टप्रायझेसचे खत्री ब्रदर्सवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोंढाणे या पाटबंधारे प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. एफ ए एन्टरप्रायझेसला कंत्राट मिळावे याकरता एफ ए एन्टरप्रायझेसचे निशार खत्री आणि खत्री ब्रदर्सने बोगस कंपन्या स्थापन केल्या, अधिका-यांशी संगनमत करुन पुर्ण निविदा प्रक्रियाच बोगस केली आणि कंत्राट मिळवलं असं एसीबीच्या तपासात समोर आले आहे.