`आयआयटीयन्स`साठी इस्त्रोचं क्षितिज!
देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात `भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत` नोकरी मिळण्याची संधी आहे.
मुंबई : देशातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक आयआयटी मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना यंदा इस्त्रोमध्ये अर्थात 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत' नोकरी मिळण्याची संधी आहे.
आयआयटी मुंबईचे प्लेसमेंट आजपासून सुरु झाले. त्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इस्रो, ओएनजीसी, एचपीसीएलसारख्या नामवंत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती आयआयटीच्या प्लेसमेंट विभागाने दिलीय.
१ ते १५ डिसेंबर दरम्यान आयआयटी पवई कॅम्पसमध्ये प्लेसमेंट प्रक्रिया पार पडेल. आयआयटीमधील पदवीधर, मास्टर आणि डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता प्लेसमेंट विभागाने वर्तवली आहे.
प्लेसमेंटसाठी आतापर्यंत १२५ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी बहुतांश कंपन्या अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित आहेत. ‘डेटा अॅनालिटिक्स’ पदासाठीची मागणी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कायम आहे.
गेल्या दोन वर्षांत ‘स्टार्टअप’ कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र यंदा ‘स्टार्टअप’ कंपन्यांची संख्या रोडावण्याची शक्यता प्लेसमेंट सेलने वर्तवली आहे.