मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि या प्रकरणातील आरोपी रमेश कदम यांनी हा घोटाळा केला असल्याचा थेट आरोप सोमय्यांनी केलाय.


'अलीबाबा आणि चाळीस चोर'


२०१४ मधे झालेल्या विधानसभा निवडणूकीत निधी म्हणून या घोटाळ्यातला पैसा वापरला गेला. या पैशातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार निवडून आल्याचा आरोप सोमय्यांनी केला. 


या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ५९ नेते गुंतले असल्याचं सांगत, सोमय्यांनी या घोटाळ्याला 'अलीबाबा आणि चाळीस चोर' असं नाव दिलं. या प्रकरणी सोमय्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग तसंच अंमलबजावणी संचालनायलाकडे कारवाईची मागणी केलीय. 


तर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात देशात चिटफंड कंपन्यांची चलती होती. त्या काळात सुमारे १ हजार ४८२ बोगस चिटफंड कंपन्या स्थापन झाल्याचं सोमय्या म्हणाले. मोदी सरकारच्या काळात अशा बोगस चिटफंड कंपन्यांवर कारवाईला गती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. यासंबंधी केंद्रीय पातळीवर आता नवा कायदा येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.