मुंबई : खासगी शाळांमध्ये लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन अॅडमिशन दिलं जात असल्याची धक्कादायक कबुली राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. मात्र यावर सरकारकडून काय पाऊल उचलणार याबाबत मात्र त्यांनी काहीच सांगीतलं नाही


घाटकोपरमधील पुणे विद्याभवन शाळेच्या 40व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांनीही उपस्थिती लावली होती.