मुंबई : सायन रूग्णालयाच्या बाल तज्ज्ञ विभागात आणखी एका महिला डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.  


दरम्यान, रुग्णालयाच्या गेटवर डॉक्टरांची निदर्शने सुरू केली आहेत. धुळ्यात डॉक्टराला मारहाण केल्यानंतर मार्डने निषेध म्हणून सामुहिक सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. हे प्रकरण आज निवळतं असे दिसत असताना आज महिला डॉक्टरांना मारहाण करण्यात आली असल्याने प्रकरण पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.