मुंबई : लष्करी जवान लान्स नायक हनुमंतप्पांनी सियाचीनच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिलीय. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांना बरे वाटावे म्हणून संपूर्ण देशात प्रार्थना करण्यात येत आहे. तुम्हीही करा. तसा #फक्तलढम्हणा हा टॅक वापरायला विसरु नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमंतप्पा आता दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे कुटुंबीयही रुग्णालयात दाखल झालेय. हनुमंतप्पा सध्या कोमात असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती लष्करानं दिलीय.


 


पुढचे ४८ तास हनुमंतपांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. इकडे साऱ्या देशात हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू झाल्या आहेत. वाराणसीत काल गंगेच्या आरतीच्यावेळी त्यांच्या प्रकृती स्वस्थ्यासाठी आराधना करण्यात आली.