जमीन खरेदी घोटाळा : जलसंपदा मंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई : वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
जामनेरमधील राष्ट्रवादीच्या दिगंबर पाटील यांनी याबाबत तक्रार केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलीय. निवडणूक लढताना महाजन यांनी भुसावळ तालुक्यातल्या जमिनीचा उल्लेख केलेला नाही.
निवडणूक आयोगापासून माहिती लपवल्यानं नियमांचा भंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. त्यामुळं महाजन यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी आयोगाकडे करण्यात आलीय.
तर निवडणूक आयोगानं विचारणा केल्यानंतर आपण उत्तर देणार असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय.