राज्यातील ८०० रेशनिंग दुकानांवर कारवाई
मुंबई - राज्यातील स्वस्त धान्य दुकानात वापरात असलेल्या वजन किंवा माप यांची पडताळणी न करता धान्य विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या दौऱ्यादरम्यान ही गोष्ट समोर आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक ठिकाणी विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली.
राज्यातील ३८३७ धान्य दुकांनाची यावेळेस तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकूण ८१२ खटले नोंदवण्यात आले. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने ही यंत्रणा महत्त्वाची आहे. त्यामुळे दुकानदाराकडून फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी जागृत असलं पाहिजे असं संबंधित अधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे. तसेक काही तक्रारी असल्यास खालील क्रमांकावर तक्रार करु शकता.
वैध मापन शास्त्र नियंत्रण कक्ष - ०२२-२२८८६६६६
इमेल - dclmms_complaints@yahoo.in
मुंबई विभाग - dyclmmumbai@yahoo.in
कोकण - dyclmkokan@yahoo.in
नाशिक - dyclmnashik@yahoo.in
पुणे - dyclmpune@yahoo.in
औरंगाबाद - dyclmaurangabad@yahoo.in
अमरावती - dyclmamravati@yahoo.in
नागपूर - dyclmnagpur@yahoo.in
यावर संपर्क साधा