VIDEO : राज ठाकरेंचा `फेसबुक`वरून जनतेशी लाईव्ह संवाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप `मनसे अधिकृत` या आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे अधिकृत अॅप 'मनसे अधिकृत' या आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जनतेशी लाईव्ह संवाद साधला.
अर्थात, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा या निमित्ताने प्रयत्न केलेला दिसला. यासाठी, मनसेने दादर माहीम विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी वॉररुम तयार केली असून आज त्याचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी राज ठाकरे पक्षाचे अधिकृत अॅप मनसे अधिकृतच्या फेसबुक अकाऊंटवरून नागरिकांशी थेट संवाद साधला.