मुंबई : तुरडाळीच्या दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्योदय योजनेतल्या २४ लाख ७२ हजार तर ४५ लाख ३४ हजार बीपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आता तुरदाळ रेशनवर मिळणार आहे.ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रतिमहिना एक किलो १२० रुपये दराने ही तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


दरम्यान, स्वस्त दरदेखील गरिबांच्या खिशाला कितपत परवडतील, याबाबत शंका आहे. सध्या बाजारात तुरडाळीचे भाव २०० रूपये किलोच्या पुढे गेले आहेत. सरकारकडून रेशनच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या डाळीचा दर १२० रूपये किलो इतका असणार आहे. महिन्याला रेशनिंग दुकानांमधून ८४ कोटी ७४ लाख किलो डाळ वाटप होईल. त्यासाठी ७०० मेट्रिक टन डाळ केंद्राने उपलब्ध करुन दिली आहे.