मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने आज पुन्हा एकदा वाढ केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी वाढ करण्यात आलेल्या कोठडीची मुदत आज संपल्याने दोघांचीही कोठडी वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाकडे केली होती. 


ही मागणी न्यायालयाने मान्य केली. दरम्यान, कालिना येथील राज्य ग्रंथालयप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल केलेत.