मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा संकल्प सादर करताना देशी व विदेशी मद्यावरील मूल्यवर्धित कर आणि साप्ताहिक लॉटरीवरील करात वाढ केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींवरील करात वाढ न करत सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. 


मद्यावरील करात वाढ झाल्याने त्यांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. मद्यावरील करात २३.८ टक्क्यांवरुन २५.९३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीये.मद्यासोबतच लॉटरीच्या सोडतीवरील करातही वाढ करण्यात आलीये.