प्रभादेवीत अपक्ष उमेदवार महेश सावंतांच्या गाडीची तोडफोड
मतदानाच्या आधी प्रभादेवीत रविवारी रात्री राडा झालाय. वॉर्ड क्रमांक 194 मधील अपक्ष उमेदवार महेश सावंत यांची गाडी फोडण्यात आलीय.
मुंबई : मतदानाच्या आधी प्रभादेवीत रविवारी रात्री राडा झालाय. वॉर्ड क्रमांक 194 मधील अपक्ष उमेदवार महेश सावंत यांची गाडी फोडण्यात आलीय.
अज्ञात व्यक्तींनी सावंत यांची स्वीफ्ट डिझायर गाडीची नासधूस केलीय. सावंत यांच्या प्रभादेवीच्या वाकडीचाळ इथल्या घराबाहेर ही घटना घडलीय.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. या वॉर्डातून महेश सांवत यांच्याविरोधात समाधान सरवणकर निवडणूक लढवत आहे.
मुंबई महापालिकेसाठी उद्या मतदान होत आहे. तर २३ फेब्रुवारीला महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.