मुंबई : फोर्ट परिसरातील हरिश चेंबर्स या इमारतीला आज सकाळी आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिश चेंबर्स इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही आग मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. आग झागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सध्या या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून भीतीचे वातावरण आहे.