मुंबई : मुंबईला स्मार्ट सिटी करण्याचं स्वप्न राज्यकर्ते बाळगून असले तरी शहराचा बकालपणा वाढवणाऱ्या अनधिकृत झोपड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीकेसीजवळच्या खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यासाठी खारफुटीची सऱ्हास कत्तल केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँर्पोरेट आँफिसेसची रेलचेल असलेल्या बीकेसीजवळच्या खाडीत उभ्या राहिलेल्या शेकडो अनधिकृत झोपड्या काही एका दिवसात उभ्या राहिलेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षांत मँग्रोव्ह तोडून याठिकाणी झोपड्या उभ्या राहल्या  आहेत.


एवढं सगळं होत असताना निसर्गाची हानी थांबविण्याऐवजी संबंधित प्रशासकीय विभाग मात्र डोळे झाकून गप्प आहे. कारण अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.


विशेष म्हणजे इथून काही अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. दोन वर्षांपूर्वी इथल्या झोपड्या बीएमसीनं हटवल्या होत्या. परंतु पुन्हा जोमाने इथे अनधिकृत झोपड्या इथं वाढत आहेत.