मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात 13 ऑक्टोबरपासून उच्च न्यायलयात सुरू होणा-या अंतीम सुनावणीच्या पाश्वभूमीवर वर्षा बंगल्यावर आज सर्वपक्षीय मराठा नेत्यांची बैठक पार पडली. 


सरकारतर्फे न्यायालयात नेमकी काय बाजू मांडली जाणार, याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रामुख्याने मराठा समाज आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे ही बाब न्यायालयाला पटवुन देण्याचा समितीचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे माटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.