मुंबई : गेल्यावर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेमुळे जसा गोंधऴ उडाला तसा गोंधऴ यावर्षी एमबीबीएस पास होणा-या विद्यार्थ्यांचा होणारेय. त्याला कारणही तसेच आहे. आता एमबीबीएस पास झालेल्या विद्यार्थ्यांना एक्झीट परीक्षा  द्यावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता केवळ एमबीबीएस होऊन चालणार नाही तर एमबीबीएस पास झाल्यावर प्रत्यक्षात प्रॅक्टीस करण्यासाठी देशभरातल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवशी एक्झीट परीक्षा द्यावी लागणारेय. तसा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतलाय. 


दरम्यान, या निर्णयाला देशभरातून विरोध होत असून राज्यातली निवासी डॉक्टरांची संस्था मार्डनेही याला विरोध दर्शवला आहे. याच धर्तीवर इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनाही बीई झाल्यानंतर अशीच परीक्षा घेण्याबाबत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद विचार करतेय. 


काय आहे एक्झीट परीक्षा ?   


- एमबीबीएस आणि इंजिनिअरींगमध्ये पदवी परीक्षा पास झाल्यानंतरही देशभरातल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. 


- एक्झीट परीक्षा दिल्यावरच संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या क्षेत्राात काम करता येणार आहे. 


- एमबीबीएस विद्यार्थ्यांना 2018 पासून त्यांच्या विद्यापीठातून केवळ पासींग सर्टींफीकेट मिळणार पण एक्झीट परीक्षा पास झाल्यानंतरच त्यांना मेडिकल काऊंसीलचे लायसंस मिळणार आहे. 


- देशात खासगी, सरकारी, अभिमत अशा विविध संस्थांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा चालतात. त्यात एकसुत्रता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.