मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या काळात ही वाहतूक अपधिम्या मार्गावर वळवण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल बेलापूर वाशी ही सेवा सकाळी सव्वा दहा ते दुपारी पावणेचार या काळात बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मेनलाईनवरून प्रवास करता येणार आहे.