व्यापारी शेतकऱ्यांना वापरून खेळू पाहतायत `काळा-पांढरा`
राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर ५००, हजार रूपयांचा नोटा थोपवण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत अशा नोटा घेण्यास नकार दिला आहे.
मुंबई : राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर ५००, हजार रूपयांचा नोटा थोपवण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत अशा नोटा घेण्यास नकार दिला आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. तरी देखील शेतकऱ्यांना या नोटा देऊन, काळा पैसा पांढरा करण्याचा हा प्रयत्न असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना ५०० आणि १००० रूपयाचा नोटा दिल्या तर ते बँकेतून बदलून घेतील, शेतकऱ्यांचा व्यवहार हा बँकेत व्यापाऱ्यांच्या मानाने नगण्य आहे. तेव्हा इनकम टॅक्सच्या सापळ्यात अडकण्यापेक्षा, शेतकऱ्यांना वापरून काळा पैसा पांढरा करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही म्हटलं जातं आहे.