मुंबई : व्यापाऱ्यांकडून शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  राज्यभरात अनेक ठिकाणी शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह व्यापाऱ्यांकडून होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र बहुतांश ठिकाणी जुन्या नोटा घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. जुन्या नोटा घेऊन नेमकं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तर डिसेंबरनंतरच आमच्याकडे काही प्रमाणात नवीन नोटा येतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे अप्रत्यक्ष शेतमालाच्या खरेदीत फार मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 


दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाऊंटवर किती पैसे टाकावेत, हा देखील प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यावर त्यांना मार्गदर्शन करणारं कुणीही नाहीय. सीएकडे जाण्याची अर्थातच बहुतांश शेतकऱ्यांची नाहीय.