मुंबई : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मेट्रोची भाडेवाढ करायला मुंबई उच्च न्यायालयानं २४ फेब्रुवारीपर्यंत मनाई केली आहे. दरवाढीबाबतची याचिका रिलायन्सनं केली होती. त्यावर उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयात सुनावणी सुरु असेपर्यंत मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करता येणार नाही, असे आदेशही न्यायालयानं यावेळी दिले. दरम्यान एमएआरडीए आणि रिलायन्सनं सर्वोच्च न्यायालयात चुकीची माहिती दिल्या प्रकरणीही मुंबई उच्च न्यायालयानं एमएआरडीए आणि रिलायन्सवर यावेळी चांगलेच ताशेरे ओढले. 


मेट्रो तिकिट दरवाढ करावी की नाही याबाबत उच्च न्यायालयानं २९ जानेवारीला सुनावणी ठेवली होती. तोपर्यंत तिकिट दर वाढवू नयेत असे आदेश न्यायालयानं दिले होते. मात्र एमएआरडीए आणि रिलायन्सला मेट्रो तिकिट दरवाढ करताच येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्याचं एमएआरडीए आणि रिलायन्सनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. ही चुकीची माहिती दिल्यावरुन उच्च नायालयानं नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.