दीपाली पाटील / मुंबई : मुंबईची लाइफलाईन असलेल्या रेल्वेच्या काही स्थानकांवर आता वायफाय सुरु झालंय. पण रेल्वेच्या वायफायमुळे नवीन धोका निर्माण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रात्री गर्दी दिसून येते. ही लोकं जमलीयेत वांद्रे रेल्वेचे मोफत वायफाय वापरण्यासाठी. रेल्वेने प्रवाशांसाठी वायफाय सेवा तर सुरु केली पण त्याचा फायदा रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या झोपडपट्टीतील रहीवासीच घेत आहेत. इतकच नाही तर वायफायचे नेटवर्क चांगले मिळावे म्हणून रेल्वे ट्रॅकजवळ जावून नेटवर्क पकडण्याचं धाडस तरुण मुलं करत आहेत. 


केवळ रेल्वे ट्रॅकजवळ नाही तर झोपडपट्टी लगत असलेल्या स्काय वॉकवरदेखील तरुणांची गर्दी असून रात्रभर तरुण मुलं तिकीट काउंटर येथे बसून असतात, अशी तक्रार स्थानिक रहीवाशी करत आहे. दरम्यान या सर्वावर रेल्वेचीही बाजू आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


प्रवाशांच्या सुविधेसाठी जरी वायफाय सुरु केले असले तरी त्याच्या दुष्परिणामांबाबत रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी विचार केलाय का ? वायफायचा होत असलेला खर्च प्रवाशांवरच खर्च होतोय की दुस-या कुणावर याचा शोध रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.