मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फळविक्रेत्याला मारहाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये राडा घातला.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये राडा घातला.
घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी घडलीये.
या फळवाल्याने मराठी माणसाला गाडी लावण्यास विरोध केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. दरम्यान, मनसेच स्टाईलचे हे आंदोलन असल्याचे सांगत उत्तर भारतीयांच्या मुजोरीला उत्तर दिल्याचे स्पष्टीकरण गटनेते संदीप देशपांडे यांनी दिले.