मुंबई : मनसेनं आपला पाकिस्तानविरोधी रोष आणखी तीव्र केला आहे.  गेल्या आठवडाभरापासून मनसे पाकिस्तान विरोधात आंदोलन करत आहे. आज  त्याचचा पुढचा भाग पॅलेडियम मॉलमध्ये बघयाला मिळाला.  झारा ब्रँडच्या शॉपमधल्या मालाची मनसे कार्यकर्त्यांनी नासधूस केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोअर परळ येथील हायस्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या झारा या कपड्यांच्या हायप्रोफाईल ब्रॅंण्ड शोरुममध्ये मनसे कार्यकर्ते आज दुपारी घुसले. सर्वात आधी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजावर संताप, मग कुलभुषण जाधव यांच्या समर्थानार्थ संपूर्ण मुंबईत बाईक रॅली आणि आता थेट शॉपिंग मॉलमध्ये घुसून पाकिस्तानी उत्पादनांची नासधूस करण्यात आली.  


पाकिस्तानामध्ये तयार झालेले कपडे झारा शोरूममध्ये विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांकडे होती. कार्यकर्त्यांनी  आंदोलन करीत पाकिस्तान बनावटीच्या कपडे रॅकमधून फेकून देत पायदळी तुडवले. आणि संताप व्यक्त केला. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वस्तू विकू नका, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरं जायला तयार राहा, असा धमकी वजा इशारा मनसेनं मुंबईतील सर्व मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या व्यपस्थापनाला दिला आहे.