विरार : शिवसेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून युती तुटल्याचा आनंद साजरा केला. विरार मनवेलपाडा तलावासमोर महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दोन्ही पक्षाचे झेंडे फडकवित फटाक्याची अतिषबाजी करत आपला अनंद साजरा केला. या निमित्ताने विभागलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र यावेत आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकावा अशी अपेक्षाही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर युती तोडण्याची अधिकृत घोषणा केली. आगामी महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपशी युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीर केलं.