मुंबई :  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाठीपुरा परिसरातून अंध असलेले विनोद अरगिले  रिंगणात उतरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मनसेने अरगिले यांना संधी दिलीय. कामाठीपूराचे स्थानिक रहीवासी असलेले विनोद अरगिले हे लहानपणापासूनच अंध आहेत.  


तरीही त्यांनी महापालिका निवडणूकीला उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. विनोद अरगिले पहील्यांदाच निवडणूकीला उभे आहेत, सध्या घरोघरी जाऊन ते प्रचार करतायत. 


अंधत्व असलं तरी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने काम करु शकेन असा आत्मविश्वास त्यांना आहे.