मुंबई : शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यापेक्षा गडकिल्ले मजबूत करा असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. 


निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करण्याच्या ही काँग्रेसची पद्धत आता भाजप पुढे नेतेय. आधी 10 वर्ष जे बघितलं तेच आता बघावं लागतंय. कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकावेळी मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटींच्या घोषणा केल्या होत्या त्याचं काय झालं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.