मुंबई :  सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादरमध्ये आमच्या राजकीय विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकू लागल्यामुळे ही खेळी करण्यात आली आहे. 


मनसेचे विद्यमान नगरसेवक सुधीर जाधव यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात महिलेने  विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. 


मोबाईलफोन वरून व्हाट्सअपच्या माध्यमातून आक्षेपार्ह मॅसेज पाठविल्याची महिलेची तक्रार या महिलेने केली होती. 


सुधीर जाधव यांना काल पोलिसांनी केली अटक आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. या संदर्भात मनसेने स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.