मुंबई : राज ठाकरेंची मनसे ही पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कलर्स मराठीवरील एका कार्यक्रमावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. कलर्सवरच्या एका कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान एकत्र नाचणार असण्याची माहिती मनसेला मिळाली होती. यावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम प्रसारित केला जाऊ नये असं पत्र मनसेकडून कलर्स मराठीच्या प्रमुखांना देण्यात आलं आहे.