शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा, राज फोडणार प्रचाराचा नारळ
तब्बल सात वर्षांनंतर शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्क इथं मनसेला जाहीर सभा घेण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
मुंबई : तब्बल सात वर्षांनंतर शिवाजी पार्कात मनसेची जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्क इथं मनसेला जाहीर सभा घेण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
येत्या गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर सभा बोलावलीय. त्यासाठी चलो शिवाजी पार्क असा नारा घोषित करण्यात आलाय. या सभेतून राज ठाकरे पालिका प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
दरम्यान, मनसेतून अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची गळती सुरु असल्याने राज ठाकरे काय भूमिका घेणार याचीही उत्सुकता आहे. अनेकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेय. गळती थांबण्याचे नाव घेत नाही. राज सातत्याने शिवसेनेला टार्गेट करताना दिसत आहे. मात्र, त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना राज काय सल्ला देणार याचीही उत्सुकता आहे.