मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाला 19 डिसेंबरला पाठवलेल्या पत्रातून तसं आयोगानं कळवलं आहे. त्यामुळे आता मनसेचे इंजिन उजवीकडून डावीकडे धावण्याच्या दिशेवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं आहे. 


याआधी मनसेची निशाणी असलेले हे रेल्वे इंजिन डावीकडून उजवीकडे धावण्याच्या दिशेने दाखवण्यात आले होते.