मुंबई : मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे, आज सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात झाली, दुपारी मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता मान्सूनचं आगमन झालं आहे. येत्या २४ तासात संपूर्ण राज्यात पावसाचं आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


मुंबईत रविवारी संध्याकाळाही देखील जोरदार पाऊस झाला, हा मुसळधार पाऊस अवघ्या तासाभराच्या आत झाल्याने, मुंबईतील काही भागात पावसाचं पाणी साचलं होतं.