मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) आधार कार्डचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला सांगितला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का तर बसेलच, पण आधार कार्डविषयी तुम्हाला आदर आणखी वाटेल आणि वाढेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड आता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांनाही बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या लहान मुलांचं आधार कार्ड जरूर करून घ्या.


कारण तुमच्या जवळची व्यक्ती कुठेही हरवली तरी, त्याच्या हाताचे फिंगर प्रिंट हे जरूर सांगतील की त्याचा घरचा पत्ता काय आहे. हे ज्यांनी आधार कार्ड काढले आहे, त्यांच्यासाठी शक्य आहे.


म्हणून हा आधारकार्डचा आतापर्यंत सर्वात मोठा फायदा आहे. ज्यामुळे हरवून जाणारी मुलंही सापडतील, लहानपणी आपण यांना पाहिलंत का ही सूचना दूरदर्शनवर यायची, पण आता बोटं आधार कार्डच्या सेन्सॉरवर ठेवल्यास ती व्यक्ती कुठली हे समजणार आहे.


धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावात फरीदाबादचा हरवलेला मुलगा आधारकार्डच्या आधारावर सापडला आहे. या हरवलेल्या मुलाचे संबंधित शिक्षकांनी आधारकार्ड काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा यापूर्वीच या मुलाचे आधार कार्ड निघाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र या मुलाचा पत्ताही तिथे दिसत होता.


मात्र दुर्देवाने या मुलाला घ्यायला त्याचे नातेवाईक पोहोचण्याआधीच, अधिक आनंदाने त्याला हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला, पण आधार कार्डचा सर्वात मोठा फायदा देशासमोर आला आहे.