एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेना खासदारांकडून मारहाण
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचे त्यांनी समर्थन केले आहे.
मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचे त्यांनी समर्थन केले आहे.
बसण्याच्या जागेवरून एअर इंडियाचा कर्मचारी आणि खासदार गायकवाड यांच्यात वाद झाला. त्याचदरम्यान चिडलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला मारले. खासदार गायकवाड हे पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला जात होते. त्यावेळी ही घटना घडली.
बिझनेस क्लासचे तिकिट खरेदी केले होते. पण जेव्हा विमानात गेलो तेव्हा मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता. त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले, त्यानंतर आपण मारहाण केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.