मुलुंड : मुंबईतल्या मुलुंडच्या नागरिकांना अस्सल सिकेपीयन खाद्य संस्कृती चाखायला मिळालीय. कायस्थ खाद्यान्न या महोत्सवात नागरिकांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला. वामनराव मुरंजन शाळेच्या पटांगणावर दोन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाज्याचे कानवले, खिम्याचे कानवले. सोड्याची खिचडी, सुरमी फ्राय निनावे असे अनेक पदार्थ या महोत्सवात होते. अभिनेते समीर धर्माधिकारी यांनीही या खाद्य महोत्सवाला भेट दिली आणि या विविध सिकेपीयन पदार्थांची चव चाखली. 


शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा महोत्सव असणार आहे. इथए रसिकांना 50 पेक्षा अधिक पदार्थांची चव चाखता येणार आहे.