बांद्रा - वरळी सी लिंक दोन दिवस बंद
तुम्ही बांद्रा - वरळी हा सी लिंक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
मुंबई : तुम्ही बांद्रा - वरळी हा सी लिंक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
सोमवार २ मे आणि मंगळवार ३ मे रोजी रात्री बांद्रा वरळी सी लिंक बंद राहणार आहे. रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहील.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हा मार्ग बंद राहील. यासंबंधी सूचना या बांद्रा रिक्लमेशनजवळही लावण्यात आलीय.