मुंबई लोकलमध्ये दोघांना कपडे काढून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. दोघांना बेदम मारहाण केलेली या व्हिडीओमध्ये दिसतेय.
मुंबई : मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. दोघांना बेदम मारहाण केलेली या व्हिडीओमध्ये दिसतेय. दोघांनाही त्यांचे कपडे काढून मारहाण करण्यात आली.
(व्हि़डिओ पाहा बातमीच्या खाली)
ज्यांना मारहाण करण्यात आली, ते दोघे मोबाईल चोर होते, अशी माहिती मिळतेय. त्यांना ट्रेनमध्ये मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर प्लॅटफॉर्मवर उतरवून त्यांना लेदरच्या बेल्टनंही मारहाण केल्याचं समजतंय. अनेक लोकांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडला. पण कुणीही या लोकांच्या सुटकेसाठी पुढे आलं नाही.
लोक फक्त या घटनेचं मोबाईलमधून शूटिंग करण्यात व्यस्त होते. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढी मोठी घटना घडत असताना पोलीस आले नाहीत. एकही पोलीस लोकल किंवा प्लॅटफॉर्मवर उपस्थित नव्हता. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे, कुठल्या ठिकाणचा आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
आम्ही यासंदर्भात रेल्वेकडे चौकशी केली. हा व्हिडीओ रेल्वेच्या अधिका-यांना मिळालाय. आणि ते अधिक यासंदर्भात अधिक चौकशी करतायत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेण्यात येतेय. पण हा व्हिडीओ बराच जुना असावा, असं रेल्वेतर्फे सांगण्यात येतंय.