मुंबईतला बुलेट ट्रेनचा स्टेशनचा तिढा सुटला
बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई : बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. या जागेवर राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रच्या दोन इमारतीं बांधायच्या आहेत.
त्या प्रस्तावित जागेच्या आराखड्याला धक्का न लावता कमीत कमी जागा वापरत भूमिगत स्टेशन बांधू असं आश्वासन रेल्वेने दिले आहे. त्याचबरोबर मुंबई नागपुर बुलेट ट्रेन मार्गाचा सुसाध्यता अहवाल करायला रेल्वे तयार झाले आहे. यामुळे राज्यातुन भविष्यात मुंबई अहमदाबाद बरोबर मुंबई नागपुर असा बुलेट ट्रेनचा दुसरा मार्ग असेल.