म्हणून अजोय मेहतांनी मागितली कोर्टाची माफी
मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज कोर्टाची विनाशर्त माफी मागितली आहे. विले-पार्लेमधील एका नगरसेविकेच्या पतीच्या अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही ते नियमित केल्यावरुन न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी त्यांनी कोर्टाची माफी मागितली आहे.
मला हायकोर्टाच्या निर्णयाची कल्पना नसल्यामुळे अनावधानाने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाला असल्याचंही आयुक्तांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.