मुंबई महापालिकेचा मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा
बीएमसीनं रस्त्यांच्या मुद्दावरून आज मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा केला आहे. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा बीएमसीने केला. उद्यावर दिवाळी आलीय. पालिका कर्मचारी सुटीवर जाणार आहेत. मग दिवाळीपूर्वी कामे कशी होतील.
मुंबई : बीएमसीनं रस्त्यांच्या मुद्दावरून आज मुंबई उच्च न्यायालयात अजब दावा केला आहे. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा बीएमसीने केला. उद्यावर दिवाळी आलीय. पालिका कर्मचारी सुटीवर जाणार आहेत. मग दिवाळीपूर्वी कामे कशी होतील.
यापुढे आयआयटीच्या इंजिनिअर्सची मदत खड्डे बुजवण्यासाठी घेतली जाणारय शिवाय रस्त्यांच्या कामावेळीही आयआयटीच्या इंजिनिअर्सचीच मदत घेऊ असा दावाही पालिकेनं केलाय. यापुढे पावसाळ्याआधी मुंबईतल्या सर्व रस्त्यांची विशेष पद्धतीने डागडुजी केली जाईल अशी ग्वाही पालिकेनं न्यायालयात दिली आहे.
आजच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश दिले असून बीएमसी, सार्वजनिक बाँधकाम विभाग, एमएमआरडीए यांच्या वादात रस्त्यावरचे खड्डे तसेच राहतात, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं.